किनगाव हे फुलंब्री तालुक्यातील एक छोटेसे गाव. पण गेल्या दोन दशकांत या गावाने जिद्दीने आणि सामूहिक प्रयत्नांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
श्री. अतुल चव्हाण यांच्या प्रेरणेने अनुराधाताई चव्हाण यांनी धामणेर, हिवरेबाजार यांसारख्या गावांमधून शिकवण घेतली आणि ती किनगावात रुजवली. ग्रामविकासात पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जलसंधारणावर विशेष भर दिला. हजारो मीटर CCT, नाला बंधारे, काँक्रिट बंधारे आणि वृक्षलागवड या उपक्रमांमुळे गावात पाणी साठले आणि परिसर हरित झाला.
शेती उत्पादकतेसोबतच तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी गावात २६ प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गाळे बांधले गेले आणि रोजगाराचे नवे मार्ग खुलले.
गावाच्या विकासात प्रत्येक रुपया गावासाठीच वापरला गेला, ही किनगावची खरी ताकद आहे. परिणामी आज किनगाव हे “आदर्शगाव” या संकल्पनेचे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे.
